ऍडलेड – ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात नेदरलॅंडने झिम्बाब्वेवर 5 गडी राखून मात केली. मात्र, हा सामना जिंकल्यावरही त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांनी साखळीत स्वीकारलेले पराभवच त्यांना भोवले आहेत. या पराभवासह झिम्बाब्वेलाही स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.
A good performance from Netherlands to seal a victory against Zimbabwe in Adelaide 👏#T20WorldCup | #ZIMvNED | 📝: https://t.co/wGbASDnUsj pic.twitter.com/PRq9lAxdDi
— ICC (@ICC) November 2, 2022
झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग आयर्विन याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. नेदरलॅंडच्या वॅन मिक्रेनसह अन्य गोलंदाजांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा डाव 19.2 षटकांत अवघ्या 117 धावांवर संपुष्टात आला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने 24 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 40 धावांची खेळी केली.
त्याला साथ देताना सिन विल्यम्सने 23 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांना शतकी पल्ला पार करता आला. नेदरलॅंडकडून वॅन मीक्रेनने सर्वाधिक 3 गडी बाद केले. बास दी लीड्डे, वॅन बीक व ब्रेंडन ग्लोव्हेर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेले 118 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या नेदरलॅंडने 18 षटकांत 5 गडी गमावून 120 धावा करत हा सामना जिंकला. त्यांच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर स्टिफन मेबर्ग अवघ्या 8 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर दुसरा सलामीवीर मॅक्स ओद्वोड याने टॉम कुपरसह दुसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागीदारी करत डाव सावरला.
#INDvsBAN । राहुल अन् कोहलीच्या ‘विराट’ खेळीने बांगलादेशसमोर धावांचा डोंगर
पूर्ण भरात असताना कुपर 29 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावून 32 धावांवर बाद झाला. मात्र, दुसरीकडे ओद्वोडने आपले अर्धशतक पूर्ण केले व संघाचे शतक फलकावर लावले. त्यानंतर मात्र, लगेचच तो बाद झाला. त्याने आपल्या 52 धावांच्या खेळीत 47 चेंडूत 8 चौकार व 1 षटकार फटकावला. तळात बास दी लीड्डेने नाबाद 12 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. झिम्बाब्वेकडून रिचर्ड नगारवा व ब्लेसिंग मुराजबानी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.