विज्ञान प्रकल्पांचा ‘झील’मध्ये प्रवाह : स्पेक्ट्रा 2k19 चे आयोजन

पुणे – झील महाविद्यालयामध्ये स्पेक्ट्रा 2k19 प्रकल्प सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पेक्ट्रा 2k19 चे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना तज्ञ समोर त्यांच्या प्रकल्पाची सादरीकरण व जाहिरात करण्यासाठी एक चांगला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता. यास अनुसरून माहीती तंत्रज्ञान विभागाने सलग तिसऱ्यावर्षीही ही परंपरा सुरूच ठेवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.

दरम्यान, या प्रकल्प सादरीकरणा अंतर्गत अनेक तांत्रिक प्रकल्प पुणे विद्यापीठातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजमधून आलेल्या स्पर्धकांनी सादर केले. सदर प्रकल्प बिग डेटा, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सिक्युरिटी व प्रायव्हसी, मशीन लर्निंग अशा वेगवेगळ्या विषयामधून निवडण्यात आले होते.

यावेळी, एकूण दोनशे स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत सर्वोत्तम कल्पना पुरस्कार झील महाविद्यालयाच्या काशिनाथ बोंगारे, मोईनुद्दीन काझी या विद्यार्थ्यांनी पटकावला. सर्वोत्तम अभिनव कल्पना पुरस्कार गुनाश्री भोसले, आयुशी सोमानी, वैष्णवी गुमान या सिंहगड इंजीनियरिंग कॉलेज वडगाव च्या विद्यार्थ्यांनी पटकावला व तृतीय क्रमांक NBN सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज च्या प्रीतम देशमुख, अनिकेत धोत्रे, योगिता तावरे व प्रियांका रजपुत या विद्यार्थ्यांनी पटकावला.

विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना दैनंदिन व्यवहारात वापरल्या पाहिजे आणि त्यातून संशोधक वृत्ती जागृत केली पाहिजे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री रोहित नर्रा यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव प्रा जयेशजी काटकर, कार्यकारी संचालक प्रा. प्रदीप खांडवे, प्राचार्य डॉ. अजित काटे, डॉ. सुरेश शिरबहादूरकर अधिष्ठाता शैक्षणिक आणि प्रशासन व विभाग प्रमुख डॉ. योगेश गुरव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श दुबे व अश्वथी पानीकर या विद्यार्थ्यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. अभिजित कर्वे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.