मुंबई – बच्चेकंपनीच्या आवडीचा हॉलीवूडचा प्रसिद्ध अॅनिमेटेड चित्रपट ‘फ्रोजन 2’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत देखील भारतात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील 2 पात्रांना चोप्रा सिस्टर्स त्यांचा आवाज देणार आहेत.
Mimi & Tisha are now Elsa & Anna! The #ChopraSisters are finally coming together for Disney’s #Frozen2. Can’t wait for you guys to see us…I mean HEAR us bring these amazing, strong characters to life in Hindi. In cinemas Nov 22.@ParineetiChopra @DisneyStudiosIN #FrozenSisters pic.twitter.com/N0c8c0g1Rx
— PRIYANKA (@priyankachopra) October 18, 2019
यातील क्रिस्टिन बेल आणि एल्सा या 2 पात्रांना प्रियांका चोप्रा आणि परिणिती चोप्रा त्यांचा आवाज देणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या फॅन्समध्ये या चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, देसी गर्ल प्रियांकाने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. हा चित्रपट 22 नोव्हेंबरला 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.