हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारींची गोळ्या घालून हत्या

लखनऊ – उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. लखनऊ नाका भागात कमलेश तिवारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

गोळीबार झाल्यानंतर कमलेश तिवारी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ट्रॉमा सेंटरमध्येच त्यांचा मृत्यू झाला. सूत्रांच्या माहिती नुसार लखनऊ येथील कमलेश तिवारी यांच्या कार्यालयात भगवे कपडे परिधान करुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.