झावरे, गुंड यांची राष्ट्रवादीकडून मनधरणी

राष्ट्रवादीचे सेलचे नव्हे लंबकाचे घड्याळ!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हे बॅटरीचे किंवा सेलचे नाही हे लंबकाचे घड्याळ आहे ते सुरूच राहणार आहे, त्यामुळे कुणी बॅटरी काढायचा प्रयत्न केला तर त्यांना बॅटरी सुद्धा याठिकाणी सापडली नाही असा टोला त्यांनी विखे यांचे नाव न घेता लगावला. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये बारा शून्य होते का शून्य बारा होते हेसुद्धा पहावे लागेल असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

नगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिनांक 21 सप्टेंबर रोजी नगर मध्ये असून यानिमित्ताने जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मेळावा येथील नंदनवन लॉन मध्ये आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली, राष्ट्रवादी पक्षातून कोणीही जाऊ नये याकरता मी अनेकांशी बोललो आहे. त्यामध्ये सुजित झावरे व मंजुषा गुंड यांचाही समावेश असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले, राष्ट्रवादी कार्यालयांमध्ये फाळके बोलत होते यावेळी कार्याध्यक्ष संदीप वर्पे अशोक बाबर अजित कदम आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष फालके म्हणाले की दिनांक 21 सप्टेंबर रोजी शरद पवार हे नगर मध्ये येत असून त्या निमित्ताने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पासूनपासून रॅली आयोजित करण्यात आले असून त्यानंतर ती माळीवाडा भागातून नंदनवन मंगल कार्यालयाकडे जाणार आहे, याठिकाणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व आमदार तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे त्यामुळे सभेच्या ठिकाणी आम्ही भगवा ध्वज लावणार असल्याचेही फाळके यांनी स्पष्ट केले भगवा ध्वज लावणे संदर्भातल्या आदेश आम्हाला पक्षाचे नसून आम्ही आमच्या पातळीवर हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले, दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नगर जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा सुद्धा करू शकतात असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले, राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगर जिल्ह्यामध्ये नऊ जागांची मागणी केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले, आमच्या वाट्याला नेमके किती जागा येतात हे यादी निश्‍चित झाल्यावरच कळेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी पक्षातून कोणी बाहेर जाऊ नये यासाठी मी बऱ्याच जणांशी बोलत आहे दोन दिवसापासून मंजुषा गुंड तसेच सुजित झावरे यांच्याशीही आम्ही संपर्क केलेला आहे त्यांच्याबरोबर सुद्धा बोलणे झालेले आहे, त्यांनाही आम्ही पक्षामध्ये थांबावे असे सांगितले असल्याचेही फाळके यांनी यावेळी सांगितले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 23 सप्टेंबर रोजी अकोला येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. याठिकाणी अशोक भांगरे तसेच किरण लहामटे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे, त्यानंतर दुपारी तीन वाजता राहुरी येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे तर सायंकाळी सहा वाजता कर्जत येथे मेळावा होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×