झरदारी यांनी दडवली 10 लाख डॉलरची मालमत्ता ; इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून नोटीस जारी

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी तब्बल 10 लाख डॉलरची मालमत्ता निवडणूकीच्या उमेदवारी अर्जामध्ये नमूद केली नाही. या आरोपावरून इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाने झरदारी यांना नोटीस बजावली आहे.

झरदारी यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मालमत्ता दडवून ठेवली, म्हणून त्यांची खासदारकी रद्द करावी या मागणीसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सत्तारुढ “पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’ या पक्षाचे नेते खुर्रम शेर झमान आणि उस्मान दर यांनी ही याचिका दाखल केली आहे. मात्र अशा प्रकरणांवरील निर्णयांचा निकाल संसदेमध्ये होणेच योग्य असल्याचे मत पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश अथार मिन्लाह यांनी व्यक्‍त केले आहे. मात्र तरिही न्यायालयाने झरदारी यांना नोटीस बजावली आहे.

माजी अध्यक्ष आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी या विरोधी पक्षाचे सह अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या मालकीचा न्यूयॉर्कमधील फ्लॅट आणि बुलेटप्रुफ कारचा उल्लेख 2018 च्या निवडणूकीतल्या उमेदवारी अर्जावर नव्हता. या दोन्हींची किंमत 143.7 दशलक्ष रुपये (1.09 दशलक्ष डॉलरपेक्षाही जास्त) आहे. झरदारी हे गेल्यावर्षीच्या निवडणूकीत सिंध प्रांतातील नावाबशाह मतदारसंघातून संसदेवर निवडून गेले आहेत.

असे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.