काबूल – अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघातील 19 वर्षीय खेळाडून झाकि अनवारी याचा काबूलमधून उड्डाण करणाऱ्या अमेरिकन लष्कराच्या विमानाला लटकून देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न करताना घडलेल्या अपघातात मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती अफगाणिस्तानमधील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाने दिली आहे. देशाच्या युवा फुटबॉल संघातील खेळाडू झाकि अनवारीचे एका अपघातामध्ये निधन झाले असून देश सोडण्याच्या प्रयत्न असणाऱ्या शेकडो तरुण मुलांमध्ये झाकिचाही समावेश आहे.
तो अमेरिकन विमानाला लटकून जाताना पडला आणि त्याचा मृत्यू झाला, असेही सांगितले आहे.