बुलडाणा – देऊळगाव राजा बायपासवर महामंडळ एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून अठरा प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी सहा प्रवासी गंभीर असल्याची माहिती आहे. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
एसटी बस यवतमाळ डेपोतून औरंगाबादच्या दिशेने निघाली होती. एसटीत पंचवीस प्रवासी होते. देऊळगाव राजा बायपासवर बसला ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातात बसच्या काही भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताचा आवाज इतका भीषण होता की आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तसेच बसमधील नागरिकांना बाहेर काढायला सुरुवात केली. या भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 18 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी 6 प्रवासी हे गंभीर जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.