Yugendra Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस दोन गट पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यानी बंडखोरी करत भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. यातच आता अजित पवार यांचे यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
युगेंद्र पवार आज शरद पवार गटात प्रवेश करतील. या संदर्भात सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट व्हायरल होत आहे. पवार कुटुंबातील आणखी एका सदस्याने अजितदादांची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळातही याची चर्चा आहे. परंतु, खुद्द शरद पवार यांनाच या गोष्टीची कल्पना नसल्याचे दिसून आले.
मात्र याबाबत माध्यमांशी युगेंद्र पवार यांना प्रश्न विचारला असतात त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. राजकारणात येण्याची इच्छा देखील युगेंद्र पवार यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले,’मला खालून वर जायला आवडेल. मी तळागाळात काम करतो. वरती जाण्यासाठी तळागाळातील अनुभव महत्त्वाचा आहे.’ असं ते म्हणाले
या दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात, पवारांची लेक विरुद्ध पवारांची सून हा राजकीय सामना पाहायला मिळणार या चर्चेने जोर धरलाय. यावरून पत्रकांराने सुप्रिया सुळेंच्या प्रचाराबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘मला सुद्धा सुप्रिया सुळेंचा प्रचार करायला आनंद होईल’. “शरद पवार माझ्यासाठी साहेब आहेत, मी त्यांचा खूप आदर करतो. त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. मी खूप छोटा आहे. ते माझ्याबद्दल बोलले खूप चांगलं वाटलं. लोकसभा निवडणुकीत जर साहेबांनी सांगितला, प्रचार करीन. साहेब म्हणतील तसं” असं सूचक विधान युगेंद्र पवार यांनी केलं.
हेही वाचा
Yugendra Pawar । सख्ख्या पुतण्याने अजित पवारांची साथ सोडली, शरद पवार म्हणाले…