Swanandi Berde: दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डेचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘मन येड्यागत झालं’ या चित्रपटात स्वानंदी अभिनेता सुमेध मुदगलकर यांच्यासोबत झळकणार आहे. नुकतच या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज झालं आहे. अभिनय बेर्डे याच्यानंतर आता स्वानंदी देखील अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यास सज्ज झाली आहे.
स्वानंदी आणि सुमेध यांची जोडी ‘मन येड्यागत झालं’ या चित्रपटातून रसिकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे. तर अभिनेत्री श्वेता परदेशी ही सहकलाकार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. यात स्वानंदी आणि सुमेधसह सुरेखा कुडची, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.
View this post on Instagram
चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश जाधव यांनी सांभाळली आहे. तर संदीप पांडुरंग जोशी आणि कुणाल दिलीप कंदकुर्ते यांनी या चित्रपटाची निर्मित केली. या चित्रपटाच्या गाण्यांना जावेद अली, निलेश पतंगे, आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, आनंदी जोशी यांनी त्यांचा आवाज दिला आहे. स्वानंदी व सुमेधचा ‘मन येड्यागत झालं’ चित्रपट येत्या 1 मार्चपासून मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
स्वानंदीने ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच तिने ‘धनंजय माने इथेच राहतात’ या नाटकातून रंगमंचावरही पदार्पण केले आहे. या नाटकात स्वानंदीबरोबर तिची आई प्रिया बेर्डे देखील होत्या.