सातारा, (प्रतिनिधी) – आरफळ, ता. सातारा येथील अजय भाईजान भोसले हा युवक कोणास काही न सांगता रविवारी (दि. 24) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. हवालदार गोरे तपास करत आहेत.
अंमली पदार्थाच्या सेवनप्रकरणी एकावर गुन्हा
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी सूरज अशोक पवार (रा. सदरबझार, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सूरज पवार हा दि. 15 ते 16 या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढताना आढळून आला.
अवैध दारू विक्रीप्रकरणी एकावर कारवाई
कोडोली, ता. सातारा येथील गणेश चौकात दि. 15 ते 16 या दरम्यान अवैधरित्या दारू विक्री करणार्या दिगंबर जटिंगा देडे (रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. सातारा) याच्यावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून 1715 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
कुर्हाडीने वार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
नितीन साहेबराव पवार (रा. आरफळ, ता. सातारा) यांच्या डोक्यात कुर्हाडीने घाव घातल्याप्रकरणी त्याच गावातील संजय निवृत्ती पवार याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 23) सायंकाळी 7 च्या सुमारास घडली. कोणतेही कारण नसताना संजय पवार याने आपल्या डोक्यात कुर्हाड मारल्याचे नितीन पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार गोरे तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा
शहरानजीक उपनगरात राहणार्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल (दि. 25) दुपारी 4.30 च्या सुमारास घडल्याचे यासंबंधीच्या फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आंबले तपास करत आहेत.