फलटण, (प्रतिनिधी) – फलटण नगरपालिका हद्दीतील मिळकतींची घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून, थकबाकीदारांची नळ कनेक्शन्स पालिकेच्या वसुली पथकाकडून बंद करण्यात येत आहेत. ही कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कराचा भरणाकरून, सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे नूतन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.
2023-24 या आर्थिक वर्षाची अखेर सुरू असून, काही मिळकतदारांनी अद्यापही घरपट्टीची रक्कम भरलेली नाही. थकीत कराच्या वसुलीसाठी पालिकेने कर्मचार्यांची विभागनिहाय 11 पथके तयार केली आहे.
ही पथके घरोघरी जाऊन मिळकत कराचा भरणा करण्याचे आवाहन करून, थकबाकी वसुली करत आहेत. थकबाकीदारांनी त्यांच्याकडील थकीत घरपट्टी व पाणीपट्टी त्वरित भरून, जप्ती, नळ कनेक्शन बंद करण्याची कटू कारवाई टाळावी. पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.