पुणे – केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा गैर वापर करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवार, दि. 27) खडकी रेलवे-स्टेशन, येथे पुणे लोणावळा लोकल थांबवण्यात आली आणि निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रीय सरचिटणीस मितेंद्र सिंग, प्रतिमा मुदगल, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन, प्रथमेश आबनावे, पुणे शहर अध्यक्ष राहुल शिरसाठ, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कौस्तुभ नवले, प्रदेश सचिव उमेश पवार, अनिकेत नवले, अनिकेत अरकडे, सौरभ अमराळे, अक्षय माने, अजित ढोकळे, राकेश मारणे आदी उपस्थित होते.