मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते.
सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तिचा चाहता वर्ग इतका मोठा आहे की, तिची एक झलक पाहण्यासाठी लोक वाटेल ते कराताना दिसतात. आणि त्यामुळेच गौतमीबद्दल लाहन-मोठी कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
दरम्यान, अश्यातच गौतमी आणि तिच्या आईचा एक व्हिडिओ समोर आला असून, सध्या मायलेकींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच गौतमीनं आपल्या आई सोबतचा एक फोटों शेयर केला होता. गौतमी अगदीच लहान असतानाचा हा फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. गौतमी पाटील अनेकदा तिच्या आईबद्दल बोलत असते. आणि आई पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौतमीचा एका चाहता म्हणाताना दिसत आहे की, ”उंबराच्या झाडाला दत्तगुरूंची सावली.. गौतमीला जन्म देणारी धन्य ती माउली”. असं तो म्हणताच गौतमीची आई समोर येते आणि गौतमी आपल्या आईला घट्ट मिठी मारते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. नेटकरी देखील या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे.