कराची – मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या यूनिस खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्याच्यांकडे टी-२० विश्वचषक २०२२ पर्यंत पाकिस्तान संघाचे फलंदाजी प्रशिक्षकपद देण्यात आले होते. परंतु त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
युनिस खान यांनी २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
दरम्यान, येत्या दोन दिवसात पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने म्हटले आहे की, “पाकिस्तान क्रिकेट संघ फलंदाजी प्रशिक्षकाशिवाय इंग्लंड दौऱ्यावर रवाना होईल. तसेच वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी लवकरच फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल.”
या घोषणेनंतर असा अंदाज व्यक्त केला जात आहे
पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी म्हटले की, “युनिससारख्या अनुभवी आणि तज्ञ व्यक्तीचे जाणे दुःखद आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि युनिस खान यांच्यात भरपूर वेळ चर्चा झाल्यानंतर युनिस खान यांनी हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.
पाकिस्तान संघाचे आंतरराष्ट्रीय दौरे
– येत्या २५ जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार
-इंग्लंड विरुद्ध पाक या दोन्ही उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका रंगणार
- २१ जुलै ते २४ ऑगस्टपर्यंत पाकिस्तान संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार.
- वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान संघ पाच टी-२० सामने आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार.