शिरूर (पुणे)- पुणे-नगर महामार्गावर शिरूर बाह्यवळणावर लुनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
काशिनाथ भगवान सावंत (वय 35, रा. पाटस, ता. दौंड) असे या अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी (दि. 8) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झाला. काशिनाथ हा लुनावरून (एमएच 42 एन 3792) अहमदनगरच्या दिशेने चालला असताना महामार्गावर थिटे कॉलेज समोर अज्ञात वाहनाने धडक दिली. त्याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. अपघात स्थळी चारचाकी वाहनाची डिस्क व नंबरप्लेट (एमएच 12 एनए 424) आढळून आली आहे.