पिंपरी, (प्रतिनिधी) – कंटेनरने दिलेल्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 18) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास राधा चौक, म्हाळुंगे येथे घडली.
कपिल संजय गायकवाड (वय 31, रा. हडपसर, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय कुसाबा गायकवाड (वय 60, रा. जालना) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (एमएच 46/ बीयु 5472) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा मुलगा कपिल गायकवाड हा मुंबई बेंगलोर महामार्गावर महाळुंगे येथे राधा चौकात रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव आलेल्या कंटेनरने कपिल यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कपिल यांचा मृत्यू झाला.