नगर, (प्रतिनिधी) – राज्यसंघ हा नगर जिल्ह्यातील शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शिक्षकांना इतर अशैक्षणिक कामे माथी मारली जात आहेत. नवभारत साक्षरता अभियान व नवीन ड्रेस कोडबाबतची शासनाची भूमिका चुकीची आहे. याबाबत लवकरच राज्यसंघ योग्य भूमिका राज्य संघ घेईल, असे आश्वासन संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांनी दिले.
जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली सदिच्छा मंडळ यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडले. अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे बापूसाहेब तांबे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जाधव होते. यावेळी तांबे म्हणाले, संघाचे काम करताना कार्यकर्त्यांची दमछाक होते.
कुटुंबाकडे दुर्लक्ष होत जाते. यामुळे कामाचे सूक्ष्म नियोजन करून सामान्य शिक्षकांच्या सुख दुःखात सहभागी व्हावे. तसेच बँक काटकसरीचा कारभार यापुढे निश्चित चालू राहील. विकास मंडळाची देखणी इमारत बांधून जिल्ह्यातील तमाम गुरुजींना अभिमान वाटावे, असे काम करणार असल्याची ग्वाही दिली.
शिबिरात संघटनेतील विविध पदे व त्यांची जबाबदारी, महिला संघटन, युवकांचा संघटनेत सहभाग, बँक सद्यस्थिती आदी विषयांवर मार्गदर्शन झाले. विकास मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दळवी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शिवरायांची संघटन पद्धती याविषयी शिवव्याख्याते हसन एम. सय्यद यांचे व्याख्यान झाले.
याप्रसंगी दत्ता पाटील कुलट, विद्युलताआढाव, राजकुमार साळवे, बबन गाडेकर, सुरेश निवडुंगे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष रामेश्वर चोपडे, नारायण पिसे, संदीप मोटे, शरद सुद्रिक, नवनाथ तोडमल, विजय ठाणगे, सरचिटणीस प्रकाश नांगरे, कार्याध्यक्ष बाबा आव्हाड, भास्कर कराळे, आबासाहेब दळवी, संतोष दळे, निर्गुणा बांगर, रविकिरण साळवे, डी. एम. शिंदे, विठ्ठल काकडे, ज्ञानेश्वर शिरसाठ,जयेश गायकवाड, सुयोग पवार,
जयेश वाघमारे,राजेंद्र ठोकळ, सचिन नाबगे, गौतम साळवे, विठ्ठल फुंदे, संतोष आंबेकर, मुकुंद सातपुते, विलास गवळी, बाळासाहेब तापकीर, कारभारी बाबर, सूर्यकांत काळे, प्रल्हाद भालेकर, कैलास सारोक्ते, माणिक कदम, बाळासाहेब कापसे,राजेंद्र कुदनर, संतोष गायकवाड, निवृत्ती धुमाळ, राहुल खराडे, राणी साळवे, अजिनाथ हजारे, वनिता सुंबे, अंजली मुळे, मीनाक्षी अवचरे उपस्थित होते. प्रास्ताविक गाडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन पिसे व प्रकाश नांगरे यांनी केले.