धक्कादायक! लग्नानंतर चौथ्या दिवशी तरुणाची गळफास लावून आत्महत्या; सांगली जिल्ह्यातील घटना

सांगली – लग्नानंतर चौथ्या दिवशी तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना चिखलगोठण (ता. तासगाव) येथे शुक्रवारी रात्री घडली. सदानंद महादेव पवार (वय 21) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदानंदचे 30 मार्चला लग्न झाले होते. सदानंदने शुक्रावारी रात्री (ता.2) उशीरा वाढर रस्त्यावरील एका शेतातील झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी सदानंदची मोटरसायकल मिळाली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत.

घरात लग्नाचे मंगलमय वातावरण असताना सदानंदने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.