पंतप्रधान मोदींनी घेतला करोना स्थितीचा आढावा; राज्यांना दिल्या ‘या’ सूचना

नवी दिल्ली  – देशात पुन्हा करोना स्थितीने डोके वर काढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक उच्चस्तरी आढावा बैठक घेऊन त्यात या स्थितीवर विचारविनीमय केला. देशातील करोना लसीकरणाच्या प्रगतीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. या बैठकीला कॅबिनेट सेक्रेटरी, पंतप्रधानांचे प्रिंसिपल सेक्रटरी यांच्यासह आरोग्य विभागाचेही वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशातील एकूण करोना रूग्णांची संख्या आता 1 कोटी 24 लाखांच्यावर गेल्याने आणि अनेक राज्यात ही स्थिती आटोक्‍याच्या बाहेर जात असल्याने त्या संबंधातील स्थितीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

देशातल्या आठ राज्यांतच करोनाच्या केसेस प्रामुख्याने वाढत आहेत. त्यात महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, तामिळनाडु, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली. केंद्र सरकारने सर्व संबंधीत राज्यांना करोना रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना संबंधीत राज्यांना देण्यात आल्या आहेत. या राज्यांना करोनाविषयक उपाययोजनांसाठी आर्थिक मदत कमी पडत आहे त्या संबंधात मात्र या बैठकीत काही निर्णय झालेला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.