शेततळ्यात बुडून तरूण शेतकऱ्याचा मृत्यू 

संगमनेर  -तालुक्‍याच्या पठारभागातील शिंदोडी येथील अजय रामदास कुदनर (वय 27) या तरूण शेतकऱ्याचा शेततळ्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि.2) सकाळी घडली. या तरुणाचे 20 दिवसांपुर्वीच लग्न झाले होते. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

अजय घरापासूनच काही अंतरावरच असलेल्या शेततळ्यावर मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान विद्युत मोटार चालू करण्यासाठी शेततळ्यावर गेले होते. पण अचानक त्यांचा पाय घसरून ते शेततळ्यात पडले. शेततळ्यातील पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजय घरी न आल्याने घरचे त्यास पाहण्यासाठी गेले असता सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.