लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज 6 वा स्मृतिदिन

यावर्षीचा 'संघर्ष दिन असेल वेगळा

बीड – 3 जून म्हणजेच लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा 6 वा स्मृतिदिन. यावर्षी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत परळीचा दौरा रद्द केला आहे.

मुंडे समर्थक 3 जून हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून साजरा करतात. दरवर्षी यादिवशी गोपीनाथ गड माणसांनी तुडुंब भरलेला असतो. ढोक महाराजांचं कीर्तन, मुख्य कार्यक्रम आणि प्रसाद असा दरवर्षीचा नियम असतो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी तो साधा आणि मोजक्या लोकांमध्ये असणार आहे.

यावर्षी कसा साजरा होणार हा संघर्ष दिन?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून जनतेला यंदाचा स्मृतिदिन कशा पद्धतीने करावा याबद्दल एक पोस्ट केली आहे. मुंडे समर्थकांना त्यांनी यावेळी सर्व कुटुंबियांसमवेत मुंडे साहेबांच्या फोटो समोर उजव्या बाजूला घरातील महिला आणि डाव्या बाजूला पुरुष उभे राहून दोन दिवे/समई लावायचे असल्याचे सांगितले आहे. स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारे म्हणून हे दिवे लावायचे असून कोणतेही एक सामाजिक कार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थही बनवण्यास सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधांचे वाटप करून त्याचे फोटो देखील पंकजा मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करण्यास सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.