पुणे : पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे उद्या ( गुरुवारी) शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
याबाबत लेखी आदेश काढण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, शुक्रवारीही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने गुरुवारी हवामान विभागाकडून याबाबत अंदाज घेऊन शुक्रवारच्या सुट्टीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.