लाल, पिवळी, हिरव्या रंगाच्या शिमला मिरची… दिसायला छानचं!!!कोणताही पदार्थ, सॅलड, चायनीज, पिझ्झा असो चव वाढवण्याचे काम शिमला मिरची करते. परंतु ही शिमला मिरची चवी सोबतच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
1. शिमला मिरची मध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने शरीरात कॅलरीचे प्रमाण वाढत नाही.
2. शिमला मिरची साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते व कोलेस्ट्रॉल ही नियंत्रणात ठेवते.
3. शिमला मिरची खाल्याने अपचन, गॅस यांवर गुणकारी ठरते.
4. शिमला मिरचीचा सॅलड मध्ये उपयोग केला जातो. यामुळे मेटाबोलिसम सुधारते व वजन कमी करण्यास मदत करते.
5. शिमला मिरची मध्ये व्हिटॅमिन अ, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन क, फायबर, कॅरिटेनॉइड्स तत्व असतात.
6. ज्यांना गुडघ्यात दुखत असेल शिमला मिरची खाणे फायदेशीर ठरते.
7. शिमला मिरची मध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लमेटरी, लायकोपेन भरपूर प्रमाणात असतात.
8. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढवते. लंग इन्फेकशन, अस्थमा यांवर शिमला मिरची फायदेशीर ठरते.
डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ञ