भिगवण -येथील प्रभाग क्रमांक तीनमधील ज्येष्ठ महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गावातील करोनाचा तिसरा बळी ठरला आहे. त्यामुळे गावामध्ये घबराट पसरली आहे. यापूर्वी भिगवण स्टेशन येथील दोन महिलांचा करोनामुळे मृत्यू झाला होता.
प्रभाग क्रमांक तीनमधील ज्येष्ठ महिला आजारी होती. त्यांना बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान शुक्रवारी (दि24) महिलेचा मृत्यू झाला आहे.
महिलेच्या संपर्कातील 15 जणांची चाचणी करण्यात आली असून, त्यांच्या अहवालांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दरम्यान, थोरातनगर येथील बाधित व्यावसायिकांच्या संपर्कातील 38 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.