नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. संसर्गजन्य असलेल्या या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अद्याप प्रतिबंधात्मक लस अथवा औषोधोपचार उपलब्ध नसल्याने लॉक डाऊन योग्यच. मात्र या लॉक डाऊनमुळे मोलमजुरीसाठी परप्रांतात आलेल्या मजुरांचे आतोनात हाल झाले हे ही खरे.
असं असलं तरी या अडचणीच्या काळात मजुरांना त्यांच्या इच्चीत स्थळी पोहचवण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केल्याचं देखील पाहायला मिळालं. अशीच मदत नोएडा येथील एका १२ वर्षीय लहानगीने केली असून तिने साठवलेल्या पैशातून तीन मजुरांना आपल्या घरी जाण्यास मदत केलीये.
मजुरांना आपल्या साठवलेल्या पैशांमधून मदत करणाऱ्या या मुलीचं नाव निहारिका दि्वेदी आहे. नोएडा येथील रहिवाशी असलेल्या निहारिकाने साठवलेल्या ४८००० हजार रुपयांतून तीन मजुरांचा हवाई प्रवास घडवून आणला आहे. याबाबत बोलताना, “समाजाने आपल्याला बरंच काही दिलं आहे, आणि आता या अडचणीच्या काळात समाजासाठी काहीतरी करावं ही आपली जबाबदारी आहे” असं मत निहारिकाने व्यक्त केलं आहे.
निहारिकाचे पालक देखील तिच्यातील दातृत्वाची भावना पाहून खुश असून त्यांनी निहारिकाने साठवलेल्या पैशांमधून तीन मजुरांना हवाई प्रवासाचे तिकीट काढून दिले आहे.
Noida: A 12-year-old girl, Niharika Dwivedi, gives away Rs 48,000 from her savings to send three migrant workers to Jharkhand via air. She says, “Society has given us so much & it is our responsibility to pay back to it in this crisis”. (31.5.2020) pic.twitter.com/LOPbpI7IYF
— ANI UP (@ANINewsUP) May 31, 2020