‘तू देशाचा पंतप्रधान हो’ फॅन्सच्या इच्छेवर सोनू सूद म्हणाला

मुंबई –  करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात पूर्णपणे पोखरून काढले आहे. प्रत्येक दिवशी लाखोंच्या संख्येने विक्रमी करोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. देशात प्रचंड वेगाने होत असलेल्या संसर्ग आणि अपुऱ्या पडत असलेल्या आरोग्य सुविधा, यामुळे देशात अनेक करोनाबाधितांचे प्राण जात आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यूंची नोंद होत आहे. त्यातच गेल्या २४ तासात देशात करोनाबळींची संख्या नकोशा उच्चांकावर पोहलची आहे. सद्य परिस्थिती बॉलीवूड अभिनेता सोनू सूदला प्रचंड वाईट वाटत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या महामारीच्या काळात देशभरातील गरजूंना मदत करणारा दानशूर अभिनेता सोनू सुद ही ओळख देशात निर्माण करणारे सोनू सुद यांनी  करोनाच्या काळात अनेक गरजुंना मदत केली आहे. त्यामुळे  सोनू सूदचे काम पाहून सध्या जो तो त्याला पंतप्रधान बनण्याची मागणी करतोय. अभिनेत्री  राखी सावंतने सोनू पंतप्रधान व्हायला हवा, अशी जाहिर इच्छा व्यक्त केली.  सोशल मीडियावरही अनेक लोक  सोनूला पंतप्रधान बनवाला हवा, तो पंतप्रधान बनावा, अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत.  यावर आता त्यानेच आपलं  मत आहेव्यक्त केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

पापाराझी सोनूला पंतप्रधान बनण्यावर प्रतिक्रिया विचारतात त्यावर तो नम्रपणे म्हणाला,’ ‘ जो जिथे आहे , तो तिथेच योग्य आहे. मी सामान्य माणूस आहे तेच बरं आहे. तुमच्यासोबतच तर मी उभा आहे. ’ असे तो म्हणतो.

सध्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओत सोनू त्याच्या घराबाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सला ज्यूसचे वाटप करताना दिसतोय. त्याच सोबत  तुम्हाला पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात? तुम्ही निवडणूक लढणार का? यावर नम्रपणे उत्तर देतांना दिसतोय.

प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओत सोनू त्याच्या घराबाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सला ज्यूसचे वाटप करताना दिसतोय. यादरम्यान पापाराझी सोनूला पंतप्रधान बनण्यावर प्रतिक्रिया विचारतात. सोनूजी, सगळे तुम्हाला पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात? तुम्ही निवडणूक लढणार का? असा प्रश्न त्याला करतात. यावर सोनू अगदी नम्रपणे उत्तर देतो.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.