मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने करोना काळात अनेक गरजू लोकांची सढळ हाताने मदत करत मसीहाच बनला होता. देशातील महामारीच्या कठीण काळात सोनूने सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. आता सोनू सूदच्या पावलावर पाऊल टाकत त्याचा मुलगा देखील लोकांच्या मदतीला धावून येत असल्याचे दिसत आहे.
सोनू सूद सध्या ‘फतेही’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठीअमृतसरमध्ये आहे. तर इकडे मुंबईत अनेक गरजू लोक सोनू सूदच्या घराजवळ मदत मागण्यासाठी आले होते, त्यामुळे आपल्या वडिलांच्या कर्तव्यात खंड पडायला नको म्हणून सोनूचं मुलगा ईशान हा गरजूंच्या मदतीसाठी धावून गेला आहे.
View this post on Instagram
सोनू सूदचा मुलगा ईशानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो घराखाली उभ्या असलेल्या लोकांना मदत करताना दिसत आहे. ईशान त्या लोकांनी आणलेले कागदपत्र देखील बघताना दिसत आहे.
ईशान सूदच्या या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांची ईशानचे कौतुक केले आहे. एका युझरनं कमेंट केली, ‘आम्हाला तुझा अभिमान वाटतो’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केली, ‘सोनू सूदच्या फतेह या चित्रपटाला आम्ही सपोर्ट करु, ज्यामुळे सोनू सूद हा सगळ्या गरजू लोकांची मदत करु शकेल. ‘ असे काही लोकांनी म्हटले आहे.