Odisha Train Accident – ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी झालेल्या तीन ट्रेनच्या भीषण अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघतानंतर 100 हून अधिक मृतदेहांची ओळख पटलेली नाही तर अद्याप अनेक मृतदेह सापडलेले नाही. या भीषण अपघातानंतर बॉलीवूड सोनू सूद पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी धावून आला आहे. सोनूने ओडिशा अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांसाठी एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.
सोनू सूदच्या खास टीमने ओडिशा अपघातग्रस्तांच्या मदतीचे कार्य देखील सुरू केले आहे. याबाबत त्याने व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे. अपघाग्रस्तांना त्यांचा व्यवसाय स्थापन करण्यासाठी आणि शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय सोनूने घेतला आहे. ओडिश अपघातातील पीडित कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी SMS द्वारे +91 9967567520 या क्रमांकावर संपर्क साधून सोनूच्या टीमशी ते जोडले जाऊ शकणार आहेत. SMS मिळाल्यावर, त्यांची टीम त्वरित प्रतिसाद देऊन पीडित कुटुंबाला मदत करणार आहे. सोनू सूदचा हा उपक्रम ओडिशा रेल्वे अपघातातील कुटुंबांना मदत करणार ठरणार आहे.
We’re helping rebuild the lives of the victims of #OdishaTrainTragedy & their families.
Drop us an SMS on +91 9967567520 to reach out for help. #SoodCharityFoundation@SoodFoundation pic.twitter.com/PBwUPrIaYe
— sonu sood (@SonuSood) June 7, 2023
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोनू सूदने या दुर्घटनेतील पीडितांसाठी शोक व्यक्त करणारा हृदयस्पर्शी संदेश शेअर केला होता. ज्यात त्याने म्हंटले होते की ‘आम्ही ट्विट करतो, शोक व्यक्त करतो, मग आपल्या आयुष्यात व्यस्त होतो. पण जे लोक घरे सोडून इतर शहरांत रोजगारासाठी गेले होते, अनेक कुटुंबे गायब झाली, त्या सर्वांचे काय, ते पुन्हा उभे राहू शकतील का? मी प्रत्येकाला त्यांच्यासाठी काहीतरी करायला सांगतो, राज्य सरकार, केंद्र सरकारने अशी धोरणे बनवायला हवी जी भविष्यासाठी आदर्श ठेवतील’, असे आवाहनही त्याने केले होते.