दुष्कृत्य करणाऱ्यांसोबत पोलिसांनी ‘हीच’ कारवाई केली पाहिजे – बाबा रामदेव

हैद्राबाद – हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील चार आरोपींचा आज पहाटे हैद्राबाद पोलिसांनी इन्काउंटर केला. हैद्राबाद पोलिसांनी ठार झालेल्या चार आरोपींना प्रकरणाचा तपास करण्यासाठी घटनास्थळावर नेले होते. त्यावेळी आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी त्यांना पळून न जाण्याचा इशारा दिला होता, मात्र, त्यांनी पळण्याचा प्रयत्न केल्यामुळे नाईलाजाने पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या चकमकीत चारही आरोपी ठार झाले. या घटनेनंतर देशातील राजकीय नेत्यांनी, कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, आता योगगुरू बाबा रामदेव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की अशा प्रकारचे अपराधी हे कलंक असतात. अशा लोकांमुळे संपूर्ण देश आणि धर्म, संस्कृती बदनाम होत असते. जे दुष्कृत्य करतात त्यांच्यासोबत आणि दशतवाद्यांविरोधात त्याच ठिकाणी पोलिसांना, सैन्याला आणि निमलष्करी दलाला अशीच कारवाई करायला हवी, असं परखड मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केलं. ज्या घटनांबाबत काही साशंकता असेल त्या घटना न्यायालयापर्यंत नेल्या पाहिजेत. त्यावेळीच कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब केला पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.