मराठी भाषेतही प्रदर्शित होणार ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा आगामी चित्रपट ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या धाडसावर हा चित्रपट आधारित आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाला. आता मराठी भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, यासंदर्भात चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्टिट करत माहिती दिली आहे. १० जानेवारीला मराठी भाषेतील हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तर, १० डिसेंबरला मराठी ट्रेलरही प्रदर्शित केला जाणार आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट मराठी भाषेतही प्रदर्शित होईल.

ओम राऊत हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अजय देवगनसोबत सैफ अली खान, शरद केळकर आणि काजोलच्या यामध्ये मुख्य भूमिका आहेत. १० जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.