मंचर -येथे शिवसेनेच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, सरपंच दत्ता गांजाळे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख अरुण गिरे, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, योगेश बाणखेले, उपतालुकाप्रमुख संतोष डोके, युवासेनेचे समन्वयक सचिन बांगर, पुणे जिल्हा युवासेना अधिकारी प्रवीण थोरात पाटील, उपसरपंच धनेश मोरडे, ग्रामपंचायत सदस्य अरुण बाणखेले, दीपक पोखरकर, संदीप जुन्नरे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.