PAK vs NZ 3rd T20, Mohammad Rizwan Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान दिसत आहे. खरंतर मोहम्मद रिझवानने असे काही केले ज्यावर त्याचा स्वतःचा विश्वास बसत नव्हता.
पाकिस्तान संघ फलंदाजी करत होता, मोहम्मद रिझवान क्रीजवर होता. वेगवान गोलंदाज मॅट हेन्री न्यूझीलंडसाठी सहावे षटक टाकण्यासाठी आला. या षटकातील पाचवा चेंडू मोहम्मद रिझवान डीप मिड-विकेटच्या दिशेने खेळला, पण त्यानंतर त्याचा तोल गेला. तोल गेल्याने मोहम्मद रिझवानची बॅट खाली पडली. तो बॅटशिवाय धावा पूर्ण करण्यासाठी धावला. पण यानंतर जे घडले ते मजेदार होते… खरं तर, त्याने नॉन स्ट्रायकर एंडवर ग्लव्स जमिनीवर टेकवून पहिली धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण तोही चुकला. त्यानंतर दुसरी धावही त्याने त्याचप्रकारे पूर्ण केली.
— Nihari Korma (@NihariVsKorma) January 17, 2024
यादरम्यान, मोहम्मद रिझवान आपली विकेट वाचवण्यात यशस्वी ठरला असला तरी त्याच्याकडून मोठी चूक झाली होती. झाले असे की, मोहम्मद रिझवानने पहिली धाव घेताना जेव्हा ग्वव्सच्या साह्याने नॉन स्ट्रायकर एंडवर हात ठेवला तेव्हा त्याचे ग्लव्स ना रेषेवर होते ना आत… यानंतर अंपायरने शॉट रन घोषित केला. त्यानंतर जेव्हा मोहम्मद रिझवानने रिप्लेमध्ये हे सर्व पाहिले तेव्हा त्याला हसू आवरता आले नाही आणि त्याने चूक लक्षात येताच स्वत:चेच डोके धरले.
— Nihari Korma (@NihariVsKorma) January 17, 2024
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडने पाकिस्तानचा 45 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडने 20 षटकांत 7 गडी गमावून 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 179 धावाच करू शकला. अशाप्रकारे किवी संघाने हा सामना 45 धावांनी जिंकला.