हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण आपल्या आगामी “फायटर’ या सिनेमात एकत्र काम करणार आहेत. एवढेच नव्हे तर हृतिक रोशनच्या बरोबरीने दीपिकानेही या सिनेमात जोरदार ऍक्शन सीन केले आहेत.
या सिनेमाची एक खासियत म्हणजे हा भारतातील पहिला एरियल ऍक्शन फिल्म असणार आहे. यात हृतिक रोशन भारतीय एअरफोर्समधील एका लढाऊ पायलटच्या रोलमध्ये दिसणार आहे.
त्याच्याबरोबर दीपिकादेखील फायटर पायलट म्हणून दिसणार आहे. हृतिक आणि दीपिकाच्या ऍक्शन सीनची श्रेणी एकसारखीच राहावी, यासाठी दोघांच्या एकत्र प्रॅक्टिसची जबाबदारी डायरेक्टर सिद्धार्थ आनंदवर येऊन पडली आहे. डायरेक्टरसमोर हे एक मोठे आव्हानच आहे.
यापूर्वी “द वॉर’चे शूटिंग करण्याचा अनुभव असल्यामुळे सिद्धार्थ आनंदवर ही मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. आतापर्यंत लढाऊ विमानांच्या चकमकीचे दृश्य भारतीय सिनेमात कधीच झाले नसल्यामुळे “फायटर’ हा एक बेंचमार्क म्हणून सिद्ध होईल, अशी आशा सिद्धार्थ आनंदला वाटते आहे.
हा सिनेमा तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण व्हावा, यासाठी त्याची पूर्वतयारी सध्या केली जात आहे. पुढच्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत या सिनेमाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे,.