नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये भाजप नेते मेहराजुद्दीन मल्ला यांचे अपहरण झाले आहे. मल्ला आपल्या मित्रासह रस्त्याने चालत होते. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी वाहनाने येऊन त्यांचे अपहरण केले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.
मेहराजउद्दीन मल्ला नगरपालिका समिती वॉटरगाम बारामुलाचे उपाध्यक्ष आहेत. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील भागातील एका अज्ञात व्यक्तीने मल्लाचे अपहरण केले असल्याचे त्याने सांगितले. मंगळवारी रात्री उशिरापासून मल्ला बेपत्ता असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. अशी माहिती काश्मीरमधील भाजप प्रवक्त्यांनी दिली.
नुकतेच जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी गोळीबार करुन भाजप नेते शेख वसीम बारी यांना ठार केले. दरम्यान, भाजपसाठी आणखी एक वाईट बातमी म्हणजे भाजप नेते मेहराजुद्दीन मल्ला यांचे अपहरण झाले आहे.
भाजप नेत्याचे अपहरण झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. सोपोरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी मल्लाचे अपहरण केल्याचे देखील सांगण्यात येत आहे.