मुंबई – भारत आणि पाकिस्तान मॅच म्हंटल की जगभरात एक वेगळाच माहोल असतो. त्यातही जर ती स्पर्धा विश्वचषकासाठीची असेल तर मग क्रिकेटप्रेमींची तयारी आधीपासून सुरु होते. सोशल मीडियासह चॅनलवर देखील जाहिराती झळकू लागतात. सध्या टी २० विश्वचषकामुळे तसेच काहीसे वातारण पाहायला मुळात आहे. या वातावरनाची भुरळ जणू wwe फेम रॉकला देखील पडली आहे. कारण नियुक्त्याच भारत पाक मॅचच्या जाहिरातीत तो दिसलाय.
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. त्यामुळे या दोन्हही देशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. फुटबॉलसह इतर खेळांचा जास्त प्राधान्य देणाऱ्या ऑस्ट्रेलियामध्ये हा वर्ल्डकप होत असल्यामुळे भारत पाक सामन्याची जाहिरात थेट WWE स्टार ‘द रॉक’ करताना दिसतोय. “जेव्हा दोन मोठे प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडणार असतात. तेव्हा संपुर्ण जग थांबतं. विशेष म्हणजे नॉर्मल क्रिकेट मॅचेसपेक्षा हे खूप काही आहे. आता भारत आणि पाकिस्तानला भिडण्याची वेळ आली आहे” असं रॉक या जाहिरातीत बोलताना दिसत आहे.
रॉकला देखील या सामन्याची प्रचंड उत्सुकता लागल्याने आता २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत पाक सामन्यासाठी तो देखील मैदानावर दिसणार का ? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. मेलबर्नमध्ये हा सामना होणार असल्यामुळे याची संपूर्ण तिकीट विक्री देखील झाली आहे.
.@TheRock is #ReadyForT20WC and will kickstart the #GreatestRivalry in style on 23rd Oct, 7 AM onwards on #CricketLive#IndvPak | #BelieveInBlue | ICC Men’s #T20WorldCup | #Blackadam pic.twitter.com/KawbyLbNGM
— Star Sports (@StarSportsIndia) October 18, 2022
असा असेल भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, विराट कोहली, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर.के. अश्विन,भुवनेश्वर कुमार,अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल
स्टँडबाय खेळाडू – रवी बिश्नोई, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर,मोहम्मद सिराज