पाकिस्तानकडे ‘हे’ दोन भारतीय खेळाडू असते तर टी-२० वर्ल्डकप जिंकला असता – नासिर हुसेन

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली सुरुवातीच्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान संघाने यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. परंतु इंग्लंडसमोर पाकिस्तानची कोणतीही रणनीती चालली नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती, परंतु संघ 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 137 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंडने 138 धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि विजेतेपदावर नाव कोरले. पाकिस्तान संघाने महत्वाच्या सामन्यात इतक्या कमी धावा केल्या त्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांची खराब फलंदाजी.
ऐकलं का! युएईच्या १७ वर्षीय खेळाडूने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम
दरम्यान, इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी सांगितले की, “पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या फलंदाजीत आणि इंग्लंडच्या फलंदाजीमध्ये खुप जास्त फरक आहे.” हुसेन यांनी टीम इंडियाचे उदाहरण देत सांगितले की,” पाकिस्तानच्या संघात सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यासारखे फलंदाज मधल्या आणि खालच्या फळीतअसायला हवेत जे वेगाने धावा करू शकतात. मात्र पाकिस्तानकडे असे खेळाडू नाहीत. हुसैन यांच्या मते, पाकिस्तानच्या संघात असे खेळाडू असते तर ते यंदा टी-२० विश्वविजेते बनू शकले असते.
नासिर हुसेन म्हणाले की,”पाकिस्तानच्या संघात खालच्या फळीत जास्त मजबूत फलंदाजी नाही. त्यामुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या काही षटकांमध्येही आपल्याला ते पाहायला मिळाले आहे. पाकिस्तानच्या संघात सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यासारखे खेळाडू नाहीत जे शेवटी येऊन वेगवान धावा करू शकतात. दुसरीकडे, अॅडलेडसारख्या खेळपट्टीवर पाकिस्तानने भारत किंवा इंग्लंडसारख्या संघाविरुद्ध मॅच-विनिंग स्कोअर केला तरी ते खेळात टिकणार नाहीत. भारताकडे खेळाडू आहेत पण समस्या खेळाडूंची नसून मानसिकतेची आहे. भारताला इऑन मॉर्गनसारखा कर्णधार हवा आहे जो खेळाडूंना मोकळेपणाने खेळायला सांगेल.”





