मुंबई – टाईमपास ३ हा मराठी चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. दगडू आणि प्राजुच्या प्रेमाचा सुरु झालेला टाईमपास चित्रपटाचे दोनीही भाग प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले होते. तिसऱ्या भागाच्या रिलीज मुहूर्तावर लेखक दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवने आपल्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. प्रियदर्शनाने प्रथमेश परबला उद्देशून ही पोस्ट लिहिल्याचे समजते.
काय म्हटलंय प्रियदर्शनने आपल्या पोस्टमध्ये
प्रियदर्शन म्हणतो,प्रिय प्रथमेश उद्या Tp3 प्रदर्शित होईल, आणि सुपरहिट सुद्धा होईल ! तुला खूप खूप शुभेच्छा ! केवळ आणि केवळ आणि केवळ तुझ्या प्रेमापोटी ( फोटो पुरावा आहे ) मी timepass ३ लिहिला. नाहीतर मी काही लिहीत नसतो, हे तू लक्षात घे आणि “हेतू” ही लक्षात घे. हल्ली सगळं seriously घेणारा मी, टाइमपास करत लिहित नसतो, खूप खूप यशस्वी हो ! मराठीतल्या ब्लॉकबस्टरची मोठ्या पडद्यावर होणार जबराट Entry 400 स्क्रिन्स आणि 10,000 शोजसह #Timepass3 29 जुलैपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला. अशा आशयाची पोस्ट प्रियदर्शनने आपल्या इंस्टाग्रामवर केली आहे.
View this post on Instagram
टाईमपासमधील दगडू आणि प्राजक्ताच्या प्रेमात अवघा महाराष्ट्र पडला होता. दगडूने आपल्या प्रेमासाठी केलेलं सॅक्रिफाईज प्रेक्षकांना चांगलाच आवडलं होत. परंतु टाईमपासच्या तिसऱ्या भागात दगडू नेमकी कोणती स्टोरी सर्वांसमोर आणतोय याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.