मुंबई : नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला असा खळबळजनक आरोप छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी केला आहे. याबाबत संयोगीताराजे छत्रपती यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकॉउंटवर एक पोस्ट लिहिली असून त्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला आलेला अनुभव लिहिला आहे. दरम्यान, त्यांनी केलेल्या या पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
“हे श्रीरामा, स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणाऱ्या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्यांना सद्बुद्धि दे…हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे…आपण सर्वजण देवाची लेकरे…आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते. असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे…”…ती पोस्ट पुढीलप्रमाणे…
View this post on Instagram
अशी पोस्ट संयोगीताराजे छत्रपती यांनी आपल्या इंस्टाग्रामवर लिहिली आहे. काही दिवसांपूर्वी काळाराम मंदिरात पूजा करताना मंदिरातील तथाकथित महंतांनी ‘पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यातील असल्याने मी त्यास विरोध दर्शवला. मात्र वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही असे महंतांनी सांगितले, अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजेंनी रामनवमीच्या दिवशी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.