Babar Azam – पाकिस्तानी क्रिकेटपटूंची इंग्रजी बोलणे किंवा लिहिण्यावरून सोशल मीडियावर अनेकदा खिल्ली उडवली जाते. सामना संपल्यानंतर समालोचकासोबतचे संभाषण असो किंवा सोशल मीडियावर काही पोस्ट लिहिणे असो, याबाबतीत पाकिस्तानी क्रिकेटर्सना अनेकदा ट्रोल केले जाते. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला ( Babar Azam ) सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. त्याचे सात वर्षे जुने ट्विट लोकांनी शोधले आहे, ज्यामध्ये त्याने झिम्बाब्वेचे स्पेलिंग बरोबर लिहिलेले नाही.
विशेष म्हणजे झिम्बाब्वेने टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले आणि अनेक नेटकऱ्यांनी बाबरला ( Babar Azam ) ट्रोल करत या पराभवाचा संबंध त्या जुन्या ट्विटशी जोडत आहेत. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. त्यांना भारताने पहिल्या सामन्यात पराभूत केले आणि नंतर झिम्बाब्वेकडून पराभूत झाल्यानंतरपाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानला केवळ उर्वरित सामने जिंकावे लागणार नाहीत, तर इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.
दरम्यान संघाचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam ) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. आझमचे सात वर्षांपूर्वीचे एक ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. यामध्ये बाबरने इंग्रजीत ‘वेलकम झिम्बाब्वे’ असे लिहिले आहे. बाबरने त्यात झिम्बाब्वेचे स्पेलिंग चुकीचे लिहिले आहे. यामुळे तो प्रचंड ट्रोल होत आहे. काही युजर्सनी याचा संबंध गेल्या सामन्यातील पाकिस्तानच्या पराभवाशी जोडला आहे. झिम्बाब्वेने गेल्या सामन्यात पाकिस्तानसारख्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या संघाचा एका धावेने पराभव केला होता. यामुळे युजर्सना बाबरला ट्रोल करण्यासाठी आणखी एक निमित्त मिळाले.
Welcome zimbaway
— Babar Azam (@babarazam258) May 19, 2015
बाबर आझमचे ( Babar Azam ) हे ट्विट मे २०१५ मधील आहे. त्यावेळी झिम्बाब्वे संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता. दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका खेळवली गेली होती. जेव्हा झिम्बाब्वेचा संघ पाकिस्तानात पोहोचल्यावर बाबर आझमने स्वागत करण्यासाठी हे ट्विट केले होते. बाबरने ट्विटमध्ये लिहिले की, ‘वेलकम झिम्बावे.’ या ट्विटमुळे बाबरला प्रचंड ट्रोल केले जात आहे.
ye jo tumne zimbabwe ki galat spelling likhi hai uska badla liya hai un ne
— Tatya Vinchu (@TatyaVinc) October 28, 2022
Zimbabwe: pic.twitter.com/TR6ZiQBO6W
— Professor ngl राजा बाबू 🥳🌈 (@GaurangBhardwa1) October 27, 2022