मुंबई – “मी घेऊन येतोय महिलांसाठी खास राखीव बस”, असं सुबोध भावेने म्हणताच संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु झाली ती म्हणजे बस बाई बस या कार्यक्रमाची. या बसमध्ये चढणारं पहिलं सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे सुप्रिया सुळे.
View this post on Instagram
या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात सुप्रिया सुळे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सुबोध भावे आणि त्याचसोबत कार्यक्रमातील महिला मंडळ सुप्रिया सुळेंचा जीवन प्रवास उलगडणार आणि त्यांना पेचात टाकणारे काही प्रश्न देखील विचारणार आहेत.
View this post on Instagram
या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जाणून घेताना एक गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल ते म्हणजे सुप्रिया सुळे या खूप चांगलं गुजराती देखील बोलतात. या भागात काही राजकारण्यांचे फोटो दाखवून सुप्रिया ताईंना त्यांच्याशी संवाद साधण्यास सांगितलं असताना मोदींजींच्या फोटो सोबत त्यांनी चक्क गुजरातीमध्ये संवाद साधला.
View this post on Instagram
त्यांना अस्खलित गुजराती बोलता येतं हि गोष्ट कदाचित खूपच कमी लोकांना माहित असावी. अशाच प्रकारे सुप्रिया ताईंबद्दल अजून गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका बस बाई बस शुक्रवार २९ जुलै रोजी म्हणजे आज रात्री ९.३० वाजता फक्त झी मराठीवर.