खुल्या गटात नितीन लावंडने मैदान मारले

पुणे – खुल्या गटात झालेल्या अंतिम कुस्तीमध्ये नितीन लावंड याने मैदान मारत विजेतेपद जिंकले. या लढतीत अक्षय मानकर याला उपविजेतापदावर समाधान मानावे लागले. 86 किलो वजन गटातील अक्षय मोहोळ व निरंजन नाकते यांची उद्‌घाटनाची कुस्ती झाली. त्यामध्ये अक्षय मोहोळ विजय मिळविला.

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून पुण्यातील मल्लांसाठी एमआयटीच्या व्यायाम शाळेमध्ये कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 60 मल्ल सहभागी झाले होते. विजेत्या मल्लांना रोख रक्कमेची बक्षिसे देण्यात आली. या कुस्त्यांचे पंच म्हणून पैलवान ज्ञानेश्‍वर माने, पै. सुभाष मोहोळ, पै. दत्ता शिंदे व पै. विनायक इंगोळकर यांनी काम पाहिले.

खुल्या गट – अक्षय मोहोळ वि.वि. निरंजन नाकते, नितीन लावंड वि.वि. अक्षय मानकर.

86 किलो – सोमेश कुडले वि.वि. निखिल सातव, नवनाथ शेप वि.वि. प्रकाश मुंढे.
74 किलो- सुमित शिंदे वि.वि. विपुल जावळकर, संदिप चामनार वि.वि. रंगनाथ पाटील, अजित मरगळे वि.वि. कृष्णा शेप.

65 किलो – आकाश घोडके वि.वि. सचिन पांढरे, प्रवीण फाले वि.वि. अजय मापारे, सौरभ उभे वि.वि. अभिषेक भंडारी, रमेश बोडके वि.वि. रोहिदास उभे, यश वीर वि.वि. गणेश कुंभार.

61 किलो – वरद इंगुळकर वि.वि. योगीराज गायकवाड, जगदीश गवारे वि.वि. कुणाल पवार, दिपक शर्मा वि.वि. अतुल तायडे.

57 किलो – यश पाटील वि.वि. गणेश पवार.
54 किलो – प्रतीक साळुंके वि.वि. केदार सणस, रामदास उभे वि.वि. वैभव खत्री.
46 किलो- ओंकार कोळी वि.वि. सुनील खंडागळे, हरिओम भोसले वि.वि. संदीप बोरुडे.
42 किलो- पवन गव्हाणे वि.वि. प्रणय वरगडे, रोशन गोपाळघरे वि.वि. लोकेश मांडेकर.

32 किलो – बरोबरी वेदांत उभे – बरोबरी अथर्व जोरी, अथर्व इंगुळकर वि.वि. प्रणव जोरी, ऋषिकेश घारे वि.वि. सौरभ शिंदे, ओंकार सातपुते वि.वि. तन्मय भगत, रुद्रांक कोरडे वि.वि. सोहम्‌ दिघे, योगेश कुट्टे वि.वि. सार्थक शिंदे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.