अर्सेनलची अव्वल चार संघांमध्ये धडक

लंडन – औबामेयांगने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर अर्सेनलने 10 जणांसह खेळणाऱ्या वॅटफोर्डचा 1-0 असा पराभव करून इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या अव्वल चार संघांमध्ये मजल मारली. या क्रमवारीत लिव्हरपूलने गुणतालिकेत 85 गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून मॅंचेस्टर सिटी 83 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. टॉटेनहॅम 67 गुणांनिशी तिसऱ्या तर अर्सेनल 66 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

वॅटफोर्डचा गोलरक्षक बेन फोस्टरकडून झालेल्या चुकीचा फायदा उठवत ओबामेयांग याने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवत संघाचे खाते उघडून दिले होते. त्यानंतर वॅटफोर्डचा कर्णधार ट्रॉय डीने याला 11व्या मिनिटाला लाल कार्ड दाखवल्यामुळे त्यांना 10 जणांसह खेळावे लागले. मात्र त्यानंतर मोठया फरकाने विजय मिळवण्यात अर्सेनलला अपयश आले.

यावेळी बोलताना अर्सेनालचे प्रशिक्षक उनाय एमेरी यांनी सांगितले की, आम्हाला अपेक्षेनुसार सामन्यावर वर्चस्व गाजवता आले नाही. गोल करण्याच्या काही संधी वाया घालवल्यामुळे संघ तणावात होता. दुसरा गोल कोण झळकावणार, हे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. पण आम्हाला एकाच गोलावर समाधान मानावे लागले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.