रोम : भारताच्या बजरंग पुनिया पाठोपाठ रवीकुमार दहिया याने रोम रँकिंग सीरिज कुस्ती स्पर्धेत आपपल्या वजनी गटात सुवर्णपदक पटकावत आॅलिम्पिक वर्षाची शानदार सुरूवात केली आहे.
भाई #RaviKumarDahiya को #RomeRankingSeries में गोल्ड मेडल जीतने पर हार्दिक शुभकामनाएं। अपना श्रेष्ठ प्रदर्शन करते रहें और ऐसे ही देश का मान बढ़ाते रहें।🇮🇳 #RoadToTokyo #Tokyo2020 pic.twitter.com/StnwKvuCjL
— Yogeshwar Dutt (मोदी का परिवार) (@DuttYogi) January 19, 2020
नियमित ५७ किलोऐवजी ६१ किलो वजनी गटात भाग घेणा-या रवीकुमारने शनिवारी रात्री उशिरा झालेल्या अंतिम फेरीत कझाकस्तानच्या नूरबोलत अब्दुलियेव्हला याचा १२-२ असा पराभव करत देशाला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.
दरम्यान, सोनीपतच्या २३ वर्षीय कुस्तीपटू रवीकुमारने याआधी मोलदोवाच्या एलेक्सांद्रू चिरतोआका आणि कजाखस्तानच्या नुरीस्लाम सानायेव याचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. तर दुसरीकडे त्याच्याआधी याच स्पर्धेत पुरूषांच्या ६५ किलो वजनी गटात बजरंगने अमेरिकेच्या जाॅर्जन मायकेल ओलिव्हरचा ४-३ ने पराभव करत सुवर्णपदक पटकावले होतं.