पिंपरी, (प्रतिनिधी) – महिला महाराष्ट्र केसरी किताब लढतीत पिंपरी चिंचवड शहराची महिला पैलवान प्रगती गायकवाड ही उपविजेती ठरली. तसेच ५७ किलो वजनी गटात निर्मिती मुर्हे कांस्यपदक पदकाची मानकरी. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व नरेंद्र अग्रवाल (भाईजी) प्रतिष्ठाण यांच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ क्रीडा विभाग छत्रपती संभाजीनगर येथे या स्पर्धा पार पडल्या.
पैलवान प्रगतीने उपांत्य फेरीत कोल्हापूरची महिला पैलवान वेदिका सासने हिला चित्रपटीने पराभूत केले. सेमीफायनलच्या लढतीत साताऱ्याची महिला पैलवान वेदांतीका पवार हिला चितपटीने पराभूत करून प्रगतीने अंतिम , महाराष्ट्र केसरीची फेरी निश्चित केली.
महाराष्ट्र केसरी अंतिम लढतीत अहमदनगरची आंतरराष्ट्रीय महिला पैलवान भाग्यश्री फड हिच्या बरोबर झालेल्या अत्यंत चुरशीच्या महाराष्ट्र केसरी लढतीत पैलवान भाग्यश्री फड महाराष्ट्र केसरी ठलली. तर पैलवान प्रगती गायकवाड ही उपमहाराष्ट्र केसरी 2023-24 किताबाची मानकरी ठरली.
या दोन्ही विजेत्या कुस्तीगीरांचे अभिनंदन पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, सरचिटणीस संतोष माचुत्रे, उपाध्यक्ष बाबासाहेब तांबे, विशाल कलाटे, भारत केसरी पैलवान विजय गावडे, दिलीप बालवडकर, राजाभाऊ जाधव, महाद्रंग वाघेरे, बाबू चिंचवडे, रतन लांडगे, गणेश काशिद, राजू कुदळे, ज्ञानेश्वर कुटे, सुरेश वाळूंज, आदी जणांनी केले.