पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवा सेनेचा कार्यकर्ता मेळावा काळेवाडीत नुकताच पार पडला. यावेळी युवासेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. युवासेनेच्या पिंपरी व चिंचवड विधानसभेतील विविध पदावर काम करणा-या शंभर पदाधिकाऱ्यांना युवासेना शहर प्रमुख चेतन पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.
मेळावा काळेवाडी येथील इंदू लॉन्स येथे पार पडला. जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, सोशल मीडियाच्या प्रदेश समन्वयक अयोध्या पोळ, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, प्रचार प्रमुख योगेश बाबर, शहर संघटीका अनिता तुतारे, उप संघटीका वैशाली मराठे, युवा सेनेचे चिंचवड विधानसभा प्रमुख विशाल नाचपल्ले, पिंपरी विधानसभा प्रमुख शुभम मुळे, दस्तगीर मणियार, माया जाधव आदी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा चिटणीस अमेय बारटक्के, समन्वयक शिवाजी चव्हाण, सुमित चव्हाण, मयूर खाडे, प्रणव वाडेकर, विभाग संघटक सांगवी नितीन भिंगारे, चिंचवड विधानसभा उप अधिकारी सुधीर कुंभार, चिंचवड विधानसभा उप अधिकारी गणेश भोसले, चिंचवड विधानसभा चिटणीस अनिकेत डेरवणकर, चिंचवड विधानसभा सोशल मीडिया अधिकारी रामचंद्र पाडुळे, चिंचवड विधानसभा समन्वयक कृष्णा ढवरे,
सांगवी प्रभागातील प्रभाग प्रमुख सागर चिंतामणी, उपविभाग प्रमुख तुलसीदास केवतकर, वीरेंद्र मानकर, सोशल मीडिया प्रमुख प्रणव वाडेकर, शाखा अधिकारी राजू लोंडके, काळेवाडीतील प्रभाग प्रमुख शुभम पांचाळ, उपविभाग प्रमुख अक्षय सरवदे, ऋषभ पिल्ले, सोशल मीडिया प्रमुख सौरभ इंगवले, शाखा अधिकारी हर्षल गाढवे, युवती प्रमुख श्रेया देवकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
राहाटणीतील प्रभाग प्रमुख प्रफुल काविष्ठे, उपविभाग प्रमुख राकेश जोशी, आकाश जाधव, सोशल मीडिया प्रमुख निलेश फुलसौंदर, शाखा अधिकारी संतोष सकपाळ, पिंपळे गुरव येथील प्रभाग प्रमुख आशिष जोशी, उपविभाग प्रमुख निरंजन जगताप, सोशल मीडिया प्रमुख ओंकार गुमास्ते, शाखा अधिकारी गौरव कुलकर्णी, वालेकरवाडी बिजलीनगर येथील प्रभाग प्रमुख ज्ञानेश्वर वायकुळे,
उपविभाग प्रमुख परशुराम कापरे, सलीम शेख, सोशल मीडिया प्रमुख मल्लिकार्जुन उकले, शाखा अधिकारी अजित शेंडगे, ताथवडे पुनावळे येथील उपविभाग प्रमुख मनोज मिटकरी, प्रदीप जाधव, सोशल मीडिया प्रमुख कार्तिकेश एडके, शाखा अधिकारी विकी चव्हाण, युवती प्रमुख ज्योती पाटोळे यांना, तसेच इतरही भागातील पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.