WPL Live Cricket Score, UPW vs MI Women’s Premier League 2024 : आज दिल्लीत यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा 14 वा सामना खेळला जात आहे.
गतविजेत्या मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ( Mumbai Indians elect to bat against UP Warriorz in Delhi ) मागील चुकांमधून धडा घेत गतविजेते प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करण्यात यशस्वी होतील, अशी अपेक्षा आहे. यूपी संघात एक बदल असताना एमआयने कोणताही बदल न करता मैदानात उतरली आहे.
WPL 2024 ( #UPWvMI Match 14 ) : मुंबईने यूपीविरुद्ध जिंकला टाॅस; घेतला ‘हा’ निर्णय….
UP vs MI : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे….
यूपी वॉरियर्स : ॲलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), किरण नवगिरे, चमारी अटापट्टू, उमा छेत्री, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, पूनम खेमनार, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकूर.
मुंबई इंडियन्स : यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, एस सजना, शबनीम इस्माईल, हुमैरा काझी, सायका इशाक.
The lineups are here 💪
A look at the Playing XIs of the two teams 🤜🤛
Live 💻📱https://t.co/qcJK240qsL#TATAWPL | #UPWvMI pic.twitter.com/pcsT1Bs25r
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 7, 2024
गेल्या सामन्यात यूपीने मुंबईचा दारूण पराभव केला होता. या सामन्यात हरमनप्रीत कौरचा संघ पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. सध्या, एमआय पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे तर यूपी पाच सामन्यांमध्ये दोन विजय नोंदवून चौथ्या स्थानावर आहे.
दरम्यान, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात जायंट्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा 13 वा सामना बुधवारी खेळला केला. या सामन्यात गुजरात जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर 19 धावांनी विजय मिळवला.