WPL Live Cricket Score, UPW vs GG Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या दुसऱ्या सत्रातील आठवा सामना UP वॉरियर्स (UPW) आणि गुजरात जायंट्स (GG) यांच्यात खेळला गेला. ग्रेस हॅरिस आणि दीप्ती शर्मा यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर यूपी वॉरियर्सने सलग दुसरा विजय संपादन केला. या सामन्यात हॅरिसने 33 चेंडूत 60 धावा केल्या. यादरम्यान तिने दोन षटकार आणि सहा चौकार लगावले. तर दीप्तीने 14 चेंडूत 17 धावांची नाबाद खेळी केली. यूपीने 26 चेंडू बाकी असताना सहा विकेट्सने सामना जिंकला. या मोसमात यूपीचा हा सलग दुसरा विजय तर गुजरात जायंट्सचा तिसरा पराभव आहे.
गुजरातविरुद्धच्या तिसऱ्या डावात ग्रेसचे हे तिसरे अर्धशतक ठरले. तिच्या शिवाय कर्णधार ॲलिसा हिलीने 21 चेंडूत 33 धावा, दीप्ती शर्माने 14 चेंडूत नाबाद 17 धावा, चामारी अथापथूने 11 चेंडूत 17 धावा आणि किरण नवगिरेने 8 चेंडूत 12 धावांचे योगदान दिले. गुजराततर्फे तनुजा कंवरने दोन, मेघना सिंग आणि कॅथरीन ब्राइसने प्रत्येकी एक विकेट घेतली.
Grace Harris is now the orange cap holder and also the Player of the Match from tonight’s #UPWvGG clash 😎👏
Scorecard 💻📱https://t.co/4LUKvUMAOB#TATAWPL | #UPWvGG | @UPWarriorz | @189Grace pic.twitter.com/wzAjMG8sdN
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 1, 2024
तत्पूर्वी, यूपीने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. गुजरात जायंट्सने निर्धारित 20 षटकात 5 विकेट गमावताना 142 धावा करताना यूपी वॉरियर्ससमोर 143 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात गुजरातने चांगली फलंदाजी केली. सलामीला आलेल्या लॉरा आणि बेथ मुनी यांच्यात पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी झाली. 18 धावा करून कर्णधार मुनी बाद झाली. त्याचवेळी लॉराने 4 चौकारांच्या मदतीने 28 धावांची खेळी खेळली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली हरलीन देओल 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तिला राजेश्वरी गायकवाडने अंजली सरवाणीच्या हातून झेलबाद केले.
WPL 2024 ( #UPWvGG Match 8 ) : गुजरातचे यूपीसमोर 143 धावांचे लक्ष्य…
यूपीविरुद्ध चौथ्या विकेटसाठी ऍशले गार्डनर आणि फोबी लिचफिल्डमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. 19व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक्लेस्टोनने गार्डनरला बाद करून त्या भागीदारीचा शेवट केला. गार्डनर 30 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फोबीही धावबाद झाली. 26 चेंडूत 35 धावा करून ती पॅव्हेलियनमध्ये परतली. दयालन हेमलता 2 तर कॅथरीन ब्राइस 5 धावांवर या सामन्यात नाबाद राहिल्या.
#PKLSeason10 #Final #PUNvHS : पुणेरी पलटणचे स्वप्न झाले साकार, विजेतेपद पटकावत रचला इतिहास…
युपी संघाकडून गोलंदाजीत सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तिने 4 षटकात 20 धावा दिल्या तर राजेश्वरी गायकवाडला एक विकेट मिळाली. तर एक फलंदाज धावबाद झाली.