तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील ज्येष्ठ कर्मचारी सुरेश शिवराम आढागळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर विभागाच्या प्रमुख अधिकारी कल्याणी लाडे, नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल टकले, सत्कारमूर्ती सुरेश आढागळे, शोभा आढागळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती मनोहर दाभाडे आदी उपस्थित होते.
या वेळी युनियनचे अध्यक्ष अनिल टकले यांनी स्वच्छता विभागात निवृत्त होणारे आढागळे व कोकाटे यांनी सफाई कर्मचारी म्हणून शेवटपर्यंत काम केले. मात्र, प्रशासनाकडून त्यांची सफाई कर्मचारी म्हणून नोंद न झाल्याने त्यांचे वारस अनुकंपाच्या सुविधेपासून वंचित राहिल्याची खंत व्यक्त केली. सूत्रसंचालन भास्कर वाघमारे यांनी केले. आभार जयंत मदने यांनी मानले.