Bank Holidays| पुढील आठवड्यात चार दिवस बँका बंद राहणार आहे. येत्या 19 रोजी रविवार असल्याने सर्व बँकांना सुट्टी असणार आहे. तर 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा पाचवा टप्पा आहे. त्यामुळे सोमवारीही काही भागातील बँका बंद राहणार आहेत. 20 मे रोजी राज्यातील 6 राज्य आणि 49 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार असल्यामुळं बँका बंद राहतील. निवडणूक प्रक्रिया मतदान असणाऱ्या शहरांमध्ये टप्प्यांनुसार बँका बंद राहतील असे निर्देश रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आले होते.
पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण 13 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये मुंबई-उत्तर, मुंबई – उत्तर पश्चिम, मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व), मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. Bank Holidays|
बँका बंद असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रसह लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार आणि जम्मू काश्मीरचा समावेश आहे. देशाच्या उर्वरित राज्यांमध्ये मात्र बँका सुरु राहणार आहेत. मुंबईमध्ये बँका सोमवारी पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर बँकेसंदर्भात कोणती महत्त्वाची कामे करायची असल्यास करून घ्या. Bank Holidays|
19 आणि 20 मे शिवाय 23 मे रोजी बुद्धपौर्णिमा आणि 25 मे रोजी मतदानाचा सहावा टप्पा असल्यामुळे बँका बंद राहतील. तसेच 25 मे रोजी महिन्याचा चौथा शनिवार आणि 26 मे रोजी रविवार अशी बँकांची आठवडी सुट्टी असणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात बँका चार दिवस बंद राहणार आहेत. मात्र बँक जरी बंद असल्यातरी डिजिटल बँकिंग सेवा, एटीम यासारख्या सोईंमुळे तुम्हाला आर्थिक व्यवहार करता येणार आहे.
हेही वाचा:
अनुष्का शर्मा सिनेसृष्टी आणि देशापासून जाणार दूर? विराटच्या व्हिडिओनंतर चर्चांना उधाण